पोलीस स्टेशनमध्येच पत्नीने घातला राडा, पतीला मारून महिला कॉन्स्टेबलच्या पोटात घातली लाथ

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहानंतर कौटुंबिक नात्यांमध्ये अनेकदा भांडणे होत असतात. परंतु ही भांडणे कोठे आणि कशी व्यक्त करायची याचे भान देखील, पती पत्नीला असायला हवे. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादातून पतीची तक्रार करण्यासाठी परिमिता देशमुख-ढोले यांनी चक्क पतीलाच मारहाण केली. एवढेच नाही तर पोलिसांना देखील मारहाण करत संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला.

पोलीस स्टेशमध्ये सुरु झालेल्या या गोंधळात तक्रार देण्यासाठी आलेल्या परिमिता यांनी इतका जोरदार गोंधळ घातला की, या गोंधळामध्ये थेट महिला कॉन्स्टेबलच्या पोटात लाथ मारली. वसई पश्चिमेकडील अंबाडी रोड येथील राजेश पार्कमध्ये परिमिता आणि शौमिक देशमुख ढोले यांचे कुटुंब राहते सोमवारी शौमिक यांना पत्नी परिमिताने काकाकडे जायचे नाही असे सांगितले. त्यानंतर शौमिक यांनी तू तुझ्या नातेवाईकांकडे जाते ना असे म्हणत जोरदार भांडण सुरु केले.

भांडण सुरु झाल्यानंतर त्याच रूपांतर थेट हाणामारीत झाले. यानंतर १६ डिसेंबर रोजी पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पतीवर गुन्हा दाखल करून एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आले.

त्यानंतर पती पोलीस स्टेशनमध्ये असतांना पत्नी ठिकाणी आली आणि तिने पाटील शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे रूपांतर झटापटीत झाले. हे सर्व सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या महिला कॉन्सटेबल रोहिणी डोके यांच्या पोटात लाथ मारली तर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर महिलेने तेथील खुर्च्या आपटत जोरदार धिंगाणा घातला त्यावर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/