डेव्हीड वॉर्नरनं ‘त्रिशतक’ झळकावल्यानंतर पत्नी कँडीस ‘भावूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नरनं 296 धावांवर असताना चौकार झळकवत त्रिशतक पूर्ण केलं. यानंतर वॉर्नरनं मैदानात जल्लोष केला. चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं. याक्षणी वॉर्नरची पत्नी मात्र भावूक झाली होती. भावूक झालेल्या वॉर्नरच्या पत्नीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

वॉर्नरनं आपलं त्रिशतक पूर्ण केल्यानंतर मैदानात तो आनंदानं धावत सुटला आणि जल्लोष केला. पाकिस्तानच्या खेळाडूंसह सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. त्याची पत्नी कँडीस हिनं या सामन्याला हजेरी लावली होती. पती वॉर्नरचा आनंद आणि त्याची कामगिरी पाहून कँडिसही भावूक झाली आणि तिलाही आपले अश्रू अनावर झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसले. कँडीसचा या क्षणीचा एक फोटोही समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

डेव्हीड वॉर्नरनं पाकिस्तानविरोधातील दुसऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावत इतिहास रचला आहे. या सामन्या डेव्हीडनं पहिल्या दिवशी शतक झळकावलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र त्यानं द्विशतकासह त्रिशतकही झळकावलं. दरम्यान दिवस रात्र कसोटी समान्यात त्रिशतक झळकवणारा वॉर्नर हा पहिला खेळाडू ठरला आहे. वॉर्नरनं 389 चेंडूत 37 चौकारांसह आपलं त्रिशतक पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियानं या सामन्यात एक विक्रम करत भारताला मागे टाकलं आहे. वॉर्नरच्या त्रिशतकीय कामगिरीमुळे विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आणि भारताला पिछाडीवर टाकलं. ऑस्ट्रेलियानं एकूण 598 धावा केल्या ज्यात वॉर्नरच्या नाबाद 335 धावांचा सिंहाचा वाटा आहे.

Visit : Policenama.com