धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधांचा संशय; पत्नीने कापले पतीचे गुप्तांग

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिसातील नबरंगपूर येथील एका महिलेने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून चक्क गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे ही, घटना घडली असून. पती रात्री झोपलेला असतांना पत्नीने धारदार चाकूने पतीचे गुप्तांग कापले. वेदनेने व्याकुळ होऊन पतीने जोरदार आरडाओरडा केल्याने परिसरातील सर्व लोक घटनास्थळी पोहोचले. आणि त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यावर उपचार सुरु असून  त्याची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले.आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतले. या महिलेचा पती तीन महिन्यांपासून तामिळनाडू येथे कामाला होता. तीन महिन्यानंतर तो गावी परतला असतांना हा धक्कादायक प्रकार घडला.