हृदयविकाराच्या झटक्याने पतीच्या मृत्यूनंतर धक्क्याने पत्नीचाही मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बागपतमधील फर्राखपूर गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेथे पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला आहे. एकाच घरात दोन लोकांच्या एकाचवेळी मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
गावात जयवीर नावाच्या 52 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जयवीरच्या मृत्यूनंतर काही मिनिटातच त्याची 50 वर्षीय पत्नी नरेशलाही पतीच्या मृत्यूचा धक्का बसला आणि तिनेही आपला जीव गमावला.
एका घरात दोन जणांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जा आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्याही पार्थिवाला सोबत खांदा देऊन दोघांवरही सोबत अंत्यसंस्कार केले गेले.