अ‍ॅपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी करून घेत होती विचित्र प्रकार, पतीचा आरोप

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक खुपच हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे की, ती अ‍ॅपवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याच्याकडून विचित्र प्रकर करून घेऊन व्हिडिओ बनवते.

पतीचा आरोप आहे की, लग्नानंतर पत्नीला टिकटॉक व्हिडिओ बनवण्याची सवय लागली. सुरूवातीला पतीला तिच्या टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या सवयीवर काहीही आक्षेप नव्हता. परंतु, नंतर पत्नी त्याच्याकडूनही डायटिंग करून घेऊ लागली, तर कधी विचित्र प्रकार करायला सांगू लागली.

पतीची तक्रार आहे की, पत्नी व्हिडिओमध्ये स्लीम दिसण्यासाठी त्याला दिवसभर उपाशी ठेवत होती आणि प्रश्न विचारल्यानंतर भांडण सुरू करत होती. यावरून या दाम्पत्याचे अगोदरही कौन्सिलिंग झाले होते, परंतु आता पुन्हा एकदा पत्नी एका नवीन अ‍ॅपमध्ये आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीकडून विचित्र काम करून घेत आहे.

पतीची तक्रार आहे की, त्याची पत्नी कधी त्यास विचित्र मेकअप करायला सांगते, तर कधी एखाद्या फिल्मी गाण्यावर सीक्वेन्स शूट करण्यास सांगते किंवा विचित्र डान्स करायला सांगते, आणि व्हिडिओ शूट करते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून त्याच्या ऑफिसपासून नातेवाईकांपर्यंत अनेकजण त्याची थट्टा करत आहेत, परंतु पत्नी ऐकायला तयार नाही.

या विचित्र तक्रारीवर बोलताना कौटुंबिक न्यायालयाच्या कौन्सिलर शैल अवस्थी यांनी म्हटले की, पतीला आपल्या पत्नीला सोडायचे नाही, परंतु तिच्या विचित्र मागणीने तो प्रचंड अस्वस्थ आहे. यापूर्वी हे दाम्पत्य जानेवारी 2020 मध्ये माझ्याकडे कौन्सिलिंगसाठी आले होते आणि त्यानंतर टिकटॉक अ‍ॅप बंद झाल्याने पतीला काही दिवस दिलासा मिळाला होता.

फॉलोअर वाढवण्यासाठी दबाव
शैल अवस्थी यांनी सांगितले की, आता एक नवीन अ‍ॅप चिंगारीमध्ये फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी आपल्या पतीवर दबाव आणत आहे, ती तिच्या सांगण्यानुसार व्हिडिओ शूट करायला सांगते, जो चिंगारी अ‍ॅपवर टाकून तिला आपले फॉलोअर्स वाढवता येतील. एवढेच नव्हे, पत्नी अनेकदा पतीला धमकी सुद्धा देते की, स्वताला स्लीम केले नाही तर ती नवे मित्र शोधेल आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ शूट करेल. मी पत्नीलाही समजावले आहे की, तिने अशा मागण्या बंद कराव्यात आणि पतीच्या म्हणण्याला सुद्धा महत्व द्यावे. सध्या दोघांचे कौन्सिंलिंग सुरू आहे.