हटके ऑफर ! ‘इथं’ घर खरेदी केल्यावर मिळते पत्नी ‘फ्री’मध्ये

इंडोनेशिया : वृत्तसंस्था – बांधकाम व्यवसायिक घर विक्रीसाठी ग्राहकांना अनेक प्रलोभनं दाखवतात. वेगवेगळ्या स्कीम बाजारात आणतात. घर खरेदीवर गृहउपयोगी वस्तू फ्री देण्याची ऑफर दिली जाते. काही जण दुचाकी, कार अशा महागड्या वस्तू फ्रीमध्ये देतात. परंतु घर खरेदीवर पत्नी फ्री अशी ऑफर कधी पाहिली आहे. इंडोनेशियातील एका बिल्डरने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर ठेवली आहे. सध्या या विचित्र ऑफरची चर्चा सुरु असून या ठिकाणी घर खरेदी केल्यानंतर पत्नी फ्रिमध्ये मिळत आहे.

ही ऑफर इंटरनेटवर व्हायरल होत आहे. खरं तर इंडोनेशियातील विना लिया नावाच्या महिलेने आपला दोन बेडरुमचा फ्लॅट  विकायला काढला आहे. तशी जाहिरात तिने ऑनलाईन पोस्ट केली आहे. घराच्या मालकिनीने घर खरेदी करणाऱ्यासोबत लग्न करण्याचा देखील प्रस्ताव ठेवला आहे. म्हणजेच घर खरेदीवर पत्नी फ्री. अशी जाहिरात छापली असून आता ही जाहिरात इंटरनेट आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

ही जाहिरात इंटरनेटवरील इतर जाहिरातींसारखी आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, सिंगल स्टोरी इमारतीत दोन बेडरुम, दोन बाथरुम आणि त्यासोबत पार्किंगची जागा आणि फिशिंगसाठी तलाव आहे. आणि ज्यांना कुणाला हे घर विकत घेयचे आहे त्याचे वय 40 असले पाहिजे. कारण घराची मालकीन घर खरेदी करणाऱ्यासोबत लग्न देखील करू शकेल.

या घराची किंमत 75 हजार डॉलर्स ठेवण्यात आली आहे. घराची मालकीन एका ब्युटी सलूनची मालक आहे. तिने आपल्या जाहिरातीमध्ये आपला फोटो ही प्रसिद्ध केले आहे. 75 हजार डॉलर्सच्या या घरासह पत्नी फ्री या ऑफरवर काही लोकांना आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वीना ही खूप हुशार आहे आणि घर विकूनही तिला पत्नी म्हणून घरावर हक्क सांगता येईल.