खळबळजनक : लातूरमध्ये ‘अनैतिक’ संबंधात ‘अडथळा’ ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि भाच्याने केला खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधाला अडथळा येत असल्याने पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पत्नीने भाच्याच्या मदतीने पतीचा खून केला. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात पत्नी आणि भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजनाथ धनसींग चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी संगीता चव्हाण आणि मारुती नामदेव शिंदे (रा. जवळगाव, तांडा ता. अंबेजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मृताचा भाऊ रंगनाथ धनसिंग उर्फ धेनू चव्हाण (रा. सौभाग्य नगर, लातूर) यांनी गातेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याच्या भाच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा होत असल्याने दोघांनी संगनमताने त्याचा खून केला.

मयत वैजनाथ हा पत्नी संगीतापासून वेगळा रहात होता. वैजनाथला त्याची पत्नी संगीता नेहमीच मारहाण करत होती. तसेच भाचा मारुती शिंदे याच्याशी तिचे अनैतिक संबध होते. त्यावरून वैजनाथ आणि संगीतामध्ये वारंवार वाद होत होते. वैजनाथ याचा मृतदेह वांजरखेडा तांडापासून एक किमी अंतरावरील जवळा बु. शिवारातील पाण्याच्या वॉलच्या खड्ड्यात सापडला. अनैतिक संबंधाला तो अडथळा होत होता म्हणून संगीता आणि भाचा मारुती यांनी मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार मयताचा भाऊ रंगनाथ चव्हाण याने केली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलीसंनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गातेगाव पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like