धक्‍कादायक ! ‘आईनं बाबांना चाकूनं भोसकलं’, 6 वर्षाच्या मुलानं नातेवाईकांना फोनवर सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. येथे पत्नीने आपल्या पतीचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील उल्कानगरी भागात हि धक्कादायक घटना घडली असून या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शैलेश राजपूत असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून पत्नीने घरगुती वादातून हि हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाने दिलेल्या माहितीमुळे हि घटना समोर आली. पती -पत्नीत झालेल्या जोरदार वादामध्ये पत्नीने चाकूने पतीवर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीचा जागीच मृत्यू झाला. हत्या झाली त्यावेळी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा हा घरातच होता. त्यावेळी त्याने तात्काळ या घटनेची माहिती फोन करून नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून या हत्या प्रकरणामागील गोष्टींचा पोलीस सध्या तपास करत आहेत. त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी तसेच शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like