धक्कादायक ! तिनं मुलीसमोरच प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीत प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या मुलीसमोरच पतीची हत्या घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीमधील समयपूर बदली मध्ये हि घटना घडली आहे. सोनू असे पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीची हत्या केल्यानंतर या महिलेने खून झाल्याचा बनाव केला. तसेच खुन्याला तातडीने अटक करण्याची देखील तिने मागणी केली होती. मात्र तिच्यावर संशय आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली असता हा बनाव उघड झाला. पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले असता पोलिसांना हि महत्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. त्याचबरोबर पतीच्या हत्येची तक्रार देखील तिने पोलिसांत नोंदवली नव्हती.

पतीच्या भावाने हि तक्रार नोंदविल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. तसेच ती महिला आपल्या शेजारी राहणाऱ्या सागर नावाच्या तरुणाच्या सतत संपर्कात होती. हत्येच्या दिवशी आपण मुलीसह झोपायला गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर हत्या होताना आपल्याला कोणताही आवाज न आल्याचे तिने पोलिसांना सांगितलं. मात्र तिच्या दाव्यात कोणतेही तथ्य न आढळल्याने पोलिसांना संशय आला असता त्यांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यामध्ये ती आपल्या शेजारी राहणार तरुण सागरच्या सतत संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, या दोघांचे प्रेसमबंध होते. त्यामुळे सोनू झोपल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला बोलावलं आणि गळा आवळून आपल्या पतीचा खून केला.

दरम्यान, पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like