पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं मुडकंच उडवलं

जयपूर : वृत्तसंस्था – पत्नी भाजीवाल्याशी हसून बोलली म्हणून पतीने संतापाच्या भरात भाजीविक्रेत्याचे मुंडके उडवले. थरकाप उडवणारी घटना राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यामध्ये घडली. आरोपी पतीने भाजीविक्रेत्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला.

लक्ष्मण सिंह (वय -४८) असे खून करण्यात आलेल्या भाजीवाल्याचं नाव आहे. तर नैना सिंह (वय २७) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैना सिंहनं कालादेह परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण सिंहची हत्या केली. लक्ष्मण सिंह हा भाजीविक्रेता होता.

घटना घडल्याच्या दिवशी लक्ष्मण सिंह आरोपीच्या घराबाहेर उभे राहून भाजी विकत घेण्यासाठी आवाज देऊ लागला. तेव्हा आरोपी नैना घराबाहेर आला आणि त्यानं लक्ष्मणच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्याचे डोकं उडवलं. पहिला वार त्याच्या कानाजवळ आणि दुसरा वार थेट त्याच्या गळ्यावर करत त्याचे डोकं धडापासून वेगळं केले.

आरोपी नैना सिंहचा स्वभाव फार संशयी होता. भाजीविक्रेत्यासोबत आपली पत्नी हसून बोलल्याचे त्याला अजिबात पटले नाही. याच रागाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुडकंच उडवलं. शिवाय, त्याला स्वतःच्या घरातही कोणी आले-गेलेले आवडायचे नाही. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.