काय सांगता ! होय, बायकोचा स्कॉर्पियोवर जडला जीव, नवऱ्याने बिल्डिंगच्या गच्चीवर केलीय पार्क

भागलपुर/बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या विधानसभा निवडणुकीत (bihar assembly election) महिंद्राची (mahindra) स्कॉर्पियो (Scorpio) गाडी नेत्यांचा आवडीची आहे. बिहारच्या रस्त्याच्या अवस्थेमुळे या गाडीची मोठी विक्री होत आहे. लॉकडाऊन (lockdown) आणि आर्थिक मंदी असतानाही बिहारमध्ये प्रत्येक महिन्याला साधारण तीन हजार गाड्यांची विक्री होत आहे. काहींसाठी ही लक्झरी आहे तर काहींसाठी बिहारच्या रस्त्यावर चालविण्यासाठी याच्याहून अधिक मजबूत दुसरी गाडीच नाही.

काही व्यक्तींची गाडीची इच्छा आहे तर काहींसाठी स्कॉर्पिओ चालवणे आवड. भागलपूर जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक गाड्यांची मागणी आहे. मात्र, गाड्यांची मागणी वाढत असल्याने डिलर गाड्यांची ऑर्डर पूर्ण करु शकत नाहीत. तारापुर विधानसभेचे उमेदवार जीतेंद्र कुमार हे देखील सध्या स्कॉर्पियोमधून फिरत आहेत. तर एका व्यक्तीला ही गाडी एवढी आवडली आहे की त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर स्कॉर्पियो उभी केली आहे.

ज्या व्यक्तीने आपल्या घरावर ही स्कॉर्पियो गाडी तयार केली आहे. त्या व्यक्तीचे नाव इंतसार आलम असे आहे. इंतसार भागलपुर जिल्ह्यात सबौर भागात राहतो. स्कॉर्पियो ही त्यांची पहिली गाडी होती. त्याच्या प्रेमासाठी त्यांनी बिल्डिंगच्या वर स्कॉर्पियो डिजायनची गाडी तयार केली आहे. इंतसार याच पत्नी आग्रा येथे गेली आह. त्यात त्यांच्या पत्नीला ही डिझाईन खूप आवडली. विशेष म्हणजे आग्राच्या मिस्त्रीने ही डिझाईन बनवूनही दिली.

इंतसार यांनी सांगितले की, अडीच लाखांमंध्ये त्यांनी स्कॉर्पिओचं हे डिझाईन बनवून घेतलं आहे. त्यांनी बिल्डिंगच्या गच्चीवर लावलेल्या या गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बिहारमधील अनेकांना याबाबत माहिती आहे. मात्र येथे नवीन येणारी व्यक्ती गच्चीवर उभी असलेली ही गाडी पाहून अचंबित होते.