पत्नीचा खून केल्यानंतर हातात ‘मुंडक’ घेवून पतीचं रस्त्यावर ‘तांडव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचे शीर धडापासून वेगळे केले आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने हातात ते मुंडके घेऊन एका रस्त्यावरून चालत जाण्याचे धाडस केले आहे. प्रदीप कुमार असे गुन्हेगाराचे नाव असून एका हातात सुरा आणि दुसऱ्या हातात महिलेचे शीर घेऊन जाणाऱ्या प्रदीपकडे पाहून लोकांना धक्का बसत होता तर अनेक जण भीतीने घाबरून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते.

आरोपी प्रदीपची ही सारी घटना रस्त्यांवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे

हा धक्कादायक प्रकार विजयवाडाच्या श्रीनगर भागातील आहेत. सुरीने पत्नीचा गळा कापून झाल्यानंतर आरोपीने रस्त्यावरून चालत जाऊन हातातील शीर एका नालयात फेकून दिले आणि स्वतःहून सत्यनारायण पुरम येथील पोलीस चौकीत आत्मसमर्पण केले. प्रदीपचे पाच वर्षांपूर्वी मनीक्रांती नामक मुलीशी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी मनीक्रांतीने पोलीस ठाण्यात छळ करण्याच्या आरोपावरून प्रदीप विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले होते त्यामुळेच ही हत्या केली गेली असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like