पत्नीने मुलाच्या मदतीने काढला पतीचा काटा

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – पतीच्या अनैतिक संबंधाना कंटाळून पत्नीनेच मुलाच्या मदतीने दगडाने ठेचून पतीचा खून केला. ही घटना भंडारा तालुक्यातील अजीमाबाद येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी व मुलाला अटक केली.

रमेश वासुदेव साठवणे (वय ४५, रा. अजीमाबाद) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी सुनीता रमेश साठवणे (वय ४०) व मुलगा बंटी ऊर्फ तुषार रमेश साठवणे (वय २४) अशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रमेशचे गावातील एका महिलेसोबत मागील काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. तो त्या महिलेसोबत राहत होता. त्याच्या अनैतिक संबंधांमुळे घरात नेहमी वाद होत होते. रविवारी रात्री याच कारणावरून वाद झाला. या वादात पत्नी सुनीता व मुलगा बंटी याने रमेशच्या डोक्यावर, तोंडावर दगडाने हल्ला केला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. कारधा पोलिसांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

You might also like