पत्नीचा खून करणारा पती अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीचा वायरने गळा आवळून खून करून पसार झालेल्या पतीला सांगवी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे.

उत्तम महादू जाधव (३७, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना जाधव (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिक शामराव वाघमारे (३४, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक यांची बहीण वंदना आणि आरोपी तिचा पती उत्तम यांच्यामध्ये वारंवार भांडण होत असे. उत्तमला दारूचे व्यसन आहे. त्यांना दीपाली जाधव (१०) आणि ओंकार जाधव (८) ही दोन मुले आहे. दररोज किरकोळ कारणांवरून उत्तम पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण करीत असे. वंदना रहाटणी परिसरात धुण्या-भांड्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होती. मागील काही दिवसांपूर्वी वंदना, त्यांचा भाऊ आणि वडिलांनी मिळून उत्तमला मारहाण केली. याचा राग मनात धरून गुरुवारी (दि. ९) पहाटे वंदना मोरीमध्ये भांडी घासत असताना तिचा मागून येऊन वायरने गळा आवळून खून केला. घटनेनंतर उत्तम घटनास्थळावरून पळून गेला.

गुरुवारी पहाटे पुंडलिक यांना त्यांच्या भावाने सांगितले की, ‘वंदनाच्या घरी भांडण झाले आहे.’ त्यानुसार दोघेही तात्काळ वंदना यांच्या घरी आले. त्यावेळी वंदना मोरीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. पुंडलिक आणि त्यांच्या भावाने वंदना यांना कारमधून नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना औंध रुग्णालयात नेण्यास सांगितले. दरम्यान पुंडलिक यांच्या भावाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

औंध रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारापूर्वीच वंदना यांना मयत घोषित केले. सांगवी पोलिसांनी उत्तमच्या शोधात पिंपळे सौदागर, रहाटणी, पुणे स्टेशन, पिंपरी स्टेशन, शिवाजी नगर रेल्वे स्टेशन एसटी स्टॅन्ड, वाकड फाटा, काळेवाडी अशा सर्व भागात पथके तैनात केली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, उत्तम अंधेरी येथे आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ अंधेरी गाठली. अंधेरी पूर्व मधील सुभाष नगर भाजी मंडई जवळ पोलिसांनी सापळा रचून उत्तमला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातीलपोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी भिसे, केंगले, बो-हाडे, भोजने, दांगडे, नरळे, अनिल देवकर, खोपकर, विनायक देवकर, देवकांत, पिसे, गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like