चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर सपासप वार करुन खून

मंगळवेढा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीवर धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. ही घटना सोमवारी रात्री मंगळवेढा तालुक्यातील डोणज हद्दीत घडली. पत्नीचा खून करुन पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली.

सखुबाई महादेव गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर महादेव श्रीमंत गायकवाड हा घटनेनंतर पसार झाला आहे. महादेव गायकवाड विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहितीनुसार, महादेव गायकवाड याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी दांडक्याने व धारदार हत्याराने तिच्या गालावर कपाळावर डोक्याजवळ सपासप वार केले. नंतर पत्नीचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. सकाळी ही घटना लक्षात आली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे डोणज गावात खळबळ उडाली आहे.

राज्यातील तब्बल 21 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या