‘थर्टी फर्स्टच्या’ रात्री पत्नीला डिनरच्या बहाण्याने नेले आणि दिला भयंकर मृत्यू

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणातील रोहतक भागात थर्टी फर्स्ट च्या रात्री पतीने पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. या घटनेत मृत झालेली महिला तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी रात्री तीला पतीचा कॉल आला त्याने बाहेर जेवायला जावू असा पत्नीला आग्रह केला. डिनरच्या बहाण्याने तो पत्नीला बाहेर घेऊन गेला.

दोघेही रात्रीच जेवणासाठी बाहेर गेले सकाळ झाली तरी आले कसे नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध करण्यास सुरूवात केली, शोध घेत असतांनाच शेतातील एका घरात महिलेचा विवस्त्र मृतदेह तिच्या घरच्यांना दिसला. या मृतदेहावर अनेक ठिकाणी वार केल्याच्या खुणा होत्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. घटनेनंतर पती फरार असून संशयित म्हणून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र आणि पिंकीचा काही वर्षांपासून विवाह झाला होता. मात्र त्यांच्यात असलेल्या मतभेदांमुळे सतत वाद सुरु असायचे. काही दिवसांपूर्वीच वाद झाल्याने पिंकी माहेरी राहण्यासाठी आली होती. तेंव्हा नवीन वर्षात आपण सर्व रुसवेफुगवे बाजूला सारुन आपण बाहेर डिनरला जाऊयात असे त्याने सांगितले. पिंकी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जेवायला गेली. त्यादरम्यान त्यांनी आमच्यातील वाद मिटले आहेत आम्ही आज सोबत राहणार आहोत. उद्या घरी येवू असे सांगितले परंतु दोघेही घरी परतले नाहीत.