विमानामध्ये ‘खुलेआम’ ४८ वर्षाच्या पतीकडून पत्नीसोबत अश्लील चाळे : वातावरण एकदम ‘गरम’ त्यानंतर झाली ‘त्याला’ अटक

अमेरिका : वृत्तसंस्था – प्रवाशांनी भरलेल्या एका विमानामध्ये पती पत्नीने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. विमानामध्ये अशाप्रकारे अश्लील चाळे केल्यामुळे पोलिसांनी दोघानांही अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. ही अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्स विमानातील ही घटना आहे.

लॉस अँजेलिस वरून सैन एन्टोनियोच्या दिशेने जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. ४८ वर्षाचे एनरिक गोनजलेज आणि त्यांच्या पत्नीला एका प्रवाशाने अश्लील चाळे करताना पाहिले.

एनरिक गोनजलेज यांना अश्लील वर्तन केल्याची शिक्षा ठोठावली आहे. अमेरिकेच्या एका कनिष्ठ न्यायालयात आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले.

FBI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, साक्षीदाराने दिलेल्या साक्षीनुसार, विमानात केबिन लाईट डिम होताच दांपत्याचे अश्लील वर्तन सुरु झाले. जवळपास अर्धा तास त्यांचे अश्लील वर्तन सुरु होते. हे वर्तन चालू असताना आरोपी ऐनरीक यांची नजर एका प्रवाशाकडे ( साक्षीदार) गेली. प्रवाशाने पाहूनसुद्धा त्याने त्याचे वर्तन तसेच चालू ठेवले.

एनरिक यांची पत्नी म्हणाली की, आम्हाला आमच्या कृत्याविषयी अंदाज होता. विमान लँड होताच दोघांनाही अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अधिक तपासानंतर पत्नीला आरोपातून मुक्त करण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त –

लठ्ठ मुलांसाठी भाटिया रुग्णालयात ओपीडी सुरू

‘या’ प्रकारचा नाष्टा आरोग्यासाठी फायदेकारक

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’

घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी