पती शिक्षक तर पत्नी वकिल ! महिलेचं दुसरीकडं जुळलं सुत अन् मास्तरला सुपारी देऊन संपवलं

पटना : प्रेमात अडसर ठरणाऱ्या शिक्षक पतीचा वकील पत्नीने खुनाची सुपारी देऊन काटा काढल्याची घटना. बख्तियारजवळ हि घटना घडली असून जमीन पाहणायसाठी शिक्षक निघाला त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. चार पथकांद्वारे या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर आठवड्यानंतर या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले. शिक्षकाची हत्या त्याच्याच वकील असलेल्या पत्नीनं करून घेतली आणि यात तिची साथ दिली तिच्या प्रियकर वकिलाने. याप्रकणी ज्यांना खुनाची सुपारी दिली होती त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रतिमा कुमार आणि सुनील कुमार गोस्वामी हे दोघेही पटनाच्या सिव्हिल कोर्टात वकील होते. अनेक दिवसापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच कोर्टात वकील असल्याने त्यामुळे पतीला त्यांच्यावर कधी शंका आली नाही. मात्र, दोघांनी शिक्षक पतीला बाजूला करायचं ठरवलं. त्यानुसार पत्नीने जमीन विकत घेण्याचा आग्रह धरला. यानंतर तिचा पती दुचाकीवर जमीन पाहाण्यासाठी निघाला. पत्नी देखील आपल्या मुलीसोबत स्कूटीवर त्यांच्या मागे गेली. ज्या ठिकाणी पतीचा खून होणार आहे त्या ठिकाणापासून काही अंतरावरच वकील पत्नीने गाडी हळू केली. शिक्षकाची गाडी छपाक वॉटर पार्कजवळ पोहोचताच आरोपींनी त्याला घेरुन गोळीबार केला. त्यानंतर काही वेळातच पत्नी आणि मुलगी तेथे पोहोचले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. आरोपीनी पतीच्या हत्या करत चार लाख चोरल्याची फिर्याद पत्नीनं पोलिसांमध्ये दिली.

पोलिसांनी तपास सुरु केला त्यावेळी त्यांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वकील प्रियकरही दिसला.त्याच्याकडे चौकशी केली असता सत्य समोर आलं. शिक्षकाची हत्या करण्यासाठी वकील जोडप्यानं कॉन्ट्रॅक्ट किलर्सला सुपारी दिली होती. चार लाखात ही सुपारी दिली गेली होती आणि ५० हजार एडव्हान्सही दिले गेले होते. यानंतर पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट किलर्सला अटक केली.