संतापजनक ! मासेमारीला जाण्यासाठी पत्नीनं केला विरोध, नवर्‍यानं पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला. मासेमारी करण्यासाठी पत्नीने नकार दिला म्हणून संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात पतीने तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हि घटना मध्य प्रदेशच्या छिंदवाडायेथून जवळ असलेल्या डेलखरी गावमध्ये घडली आहे. या भयंकर प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तातडीने पत्नीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्यामुळे तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

तामिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावातील नवा मोहल्ला येथे राहणारी बलि कहार याची पत्नी गोमतीबाई कहारसोबत मासेमारीवरून रात्री खूप वाद झाला. पतीने आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला आणि त्यामुळे संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.