अमेरिकेतील ‘सत्यवान-सावित्री’ ! तिने चक्क ज्वालामुखीत उतरुन वाचवले पतीचे ‘प्राण’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय पुराणातील सावित्रिने सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून सोडवल्याची अख्यायिका आठवावी अशी एक घटना कॅरेबियन बेटांवर घडली. ज्वालामुखीत पडलेल्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी एका महिलेने कमालीचे धाडस दाखविले. तिने जीव धोक्यात टाकत ५० फूट खोल खड्ड्यात उतरून पतीला बाहेर काढले आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्याचे प्राण वाचवले.

अमेरिकेचे असणारे क्ले चास्टौन आणि त्याची पत्नी अकायमी मधुचंद्रासाठी कॅरेबियन बेटांवर गेले होते. साहसाची आवड असणारे हे जोडपे कॅरेबियन बेटांवरील सेंट किट्स येथील माउंट लिआमुईगा पर्वतावर गिर्यारोहणासाठी गेले. कोणाचीही मदत न घेता त्यांनी ३ हजार ७०० फूटावरील शिखर गाठण्याचे ठरवले. जाताना त्यांनी वाटाड्या देखील सोबत नेला नव्हता. शिखरावर पोहोचल्यावर त्यांना एक मृत ज्वालामुखी दिसला. ज्वालामुखीत काय आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी दोर लावून ज्वालामुखीत डोकावत असताना क्ले चास्टैनने सुरक्षेसाठी वापरलेली दोरी तुटली आणि तो तब्ब्ल ५० फूट खोल ज्वालामुखीत पडला. या घटनेननंतर पत्नी अकायमी भीतीने अक्षरशः हादरली परंतु मदतीसाठी आसपास कोणीही नव्हते. मोबाईल चे देखील सोय नव्हती.

दुसरा पर्याय नसल्यनाने अखेर तिने स्वतःच तिने दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचे ठरवले. ती खाली उतरली असता मृत अवस्थेत असलेल्या ज्वालामुखीमध्ये भिंतीवर बरीच लहान मोठी झाडे आणि वनस्पती असून याच झाडांमध्ये क्ले चास्टै अडकून पडल्याचे तिला दिसले. तिने त्याला आधार देऊन वर आणले. ज्वालामुखीमधून पतीला बाहेर काढल्यानंतर अकायमीने पतीला तीन किलोमीटर दूर डोंगराच्या तळाशी असणाऱ्या गावी नेले.तेथील स्थानिक लोकांनी त्यांना मदत केली आणि २० लाख रुपये भाडे भरुन मेडिकल चार्टड प्लेनने क्लेला फ्लोरिडा येथे नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्याच्या जीवावरील धोका टळला असून तो सुरक्षित असल्याचा दिलासा डॉक्टरांनी दिला.

‘ एवढ्या उंचावरून पडून देखील आश्चर्यकारकरित्या त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नव्हती, क्लेचे कोणतेही हाड तुटले नसून केवळ मुका मार लागला आहे .त्याच्या नाकाला, पाठीला थोडीफार दुखापत झाली होती आणि एका कानाने त्याला काही काळ ऐकू येत नव्हते,’ अशी माहिती अकायमीने दिली.

आरोग्यविषयक वृत्त