धक्कादायक ! दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून खून 

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – दारूच्या नशेत पत्नीच्या मानेवर व डोक्यात कुऱ्हाडीने वार करून पतीने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील चौरे येथे घडली. त्यानंतर पती एका विहीरीत लपण्यासाठी गेला मात्र त्याला दुखापत झाली आहे.

शशिकला आनंदा सातपुते  (वय ४५)  असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आनंदा दादू सातपुते (वय ५०)याला पोलिसांनी अटक केली आहे.

आनंदा सातपुते याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नीकडे नेहमी पैशांची मागणी करत होता. पत्नी शशिकला यांनी नकार दिल्यावर त्यांच्यात भांडणं होत होती. त्यांची दोन्ही मुले आकाश आणि गणेश हे नोकरीसाठी मुंबईला राहतात. दरम्यान ते दोघे गावी आल्यावर तो त्यांनाही दारूसाठी पैसे मागायचा. तर शशिकला यांना मारहाणही करायचा.

सोमवारी सकाळी तो घरी आला. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्याने पत्नीसह मुलगा आकाशकडे पैशांची मागणी केली. परंतु पैसे न दिल्याने त्याने त्यांना शिवीगाळही केली.  त्यानंतर मुलाने समजूत काढली. त्यानंतर तो उंब्रज येथे गेला. तो सायंकाळी चारच्या सुमारास घरी आला. तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने लागलीच याची माहिती पोलिसांना दिली.

Loading...
You might also like