‘बायको’ला शिवीगाळ करणं पडलं महागात, झाली धु-धु धुलाई

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – रात्रीअपरात्री घराच्या बाहेर येऊन मोठ्मोठ्याने बोलण्याची अनेकांना सवय आहे. तो असाच रात्री पार्किंगमध्ये फोनवर बोलत होता. संसारिक कारणावरुन तो बायकोला शिवीगाळ करीत होता. आता बायको त्याची, फोनही त्याचा मग दुसऱ्याला त्यात पडायचे कारण काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, अहो पण हा आपल्या बायकोला इतक्या मोठ्या आवाजात दुसऱ्यांकडे पाहून शिवीगाळ करु लागला तेव्हा, समोरच्याला वाटले की तो आपल्यालाच शिवीगाळ करतो. त्यातून त्याने साथीदाराच्या मदतीने लाकडी बांबुने त्याची धु धु धुलाई केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी नेताजी गाडेकर, अंकुश गाडेकर, शहाजी गाडेकर, लहु गाडेकर, निलेश गाडेकर (रा. सुसगांव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रशांत जामवंत चांदेरे (वय ३०, रा. एच. पी. पेट्रोलपंपामागे, सुसगांव) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना चांदेरे यांच्या घराबाहेर ३० जून रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. प्रशांत चांदेरे हे रात्री फोनवर आपल्या पत्नीशी बोलत होते. ते पत्नीला शिवीगाळ करत असताना आपली गाडी बाहेर काढत होते त्यावेळी नेताजी गाडेकर यांनी गाडी आडवी लावली होती. ती त्यांना काढण्यासाठी सांगत असताना दुसरीकडे ते फोनवर बोलता बोलता पत्नीला शिवीगाळ करुन लागले.

तेव्हा गाडेकर यांना आपली गाडी आडवी आल्याने तो आपल्याला शिव्या देतो, असे वाटल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी चांदेरे याला लाकडी बांबुने डोक्यावर, दोन्ही पायावर, छातीत, हातावर मारहाण करुन जबर जखमी केले. त्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी काल हिंजवडी पोलिसांकडे दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

You might also like