‘फिल्मी’ अंदाजात पत्नीला ‘पवित्र’ गंगेत फेकून दिलं, जवानांनी वाचवलं अन् पुढं ‘असं’ झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या पत्नीची हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाच्या इराद्याला एसडीआरएफच्या जवानांनी सुरुंग लावला. पतीने पीडितेला नदीत ढकलून दिल्यानंतर लगेच एसडीआरएफच्या जवानांनी या महिलेला बाहेर काढले. शुद्धीवर आल्यानंतर या महिलेने आपल्या पतीचा प्रताप नागरिकांना सांगितला. त्यानंतर जवानांनी या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांनी हि महिला पोलीस स्टेशनमध्ये आली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हि महिला गेली कुठे? असा प्रश्न पडला आहे

असा केला हत्येचा प्रयत्न

एसडीआरएफच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेचार वाजता येथील कर्मचाऱ्यांना एक महिला नदीत दिसून आली. त्यानंतर या जवानांनी त्वरित या महिलेला बाहेर काढले. बेशुद्धावस्थेत बाहेर काढलेल्या या महिलेच्या पोटातून पाणी बाहेर काढल्यानंतर ती शुद्धीवर आली.

शहरसा येथील आहे महिला

शुद्धीवर आल्यानंतर या महिलेने आपले नाव आशादेवी असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला विचारले असता तिने सांगितले कि, पती अमोद कुमार साह याने आपल्याला नदीत ढकलले. त्यामुळे हि घटना अपघात वाटावा म्हणून सकाळची वेळ निवडण्यात आली होती.

पतीच्या अवैध संबंधांमुळे हत्येचा प्रयत्न

महिलेने शुद्धीवर आल्यावर सांगितलेल्या माहितीनुसार तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. तिने याचा विरोध केला असता त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या जवानांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे म्हटले होते. मात्र हि महिला पोलीस स्टेशनमध्ये आली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महिलेच्या जीवाला धोका असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like