पती घरी नसताना ‘ती’ करायची बिनधास्त ‘धंदा’, CCTV मुळं झाला ‘पर्दाफाश’

पटियाला : वृत्तसंस्था – पटियालामधून एका विवाहित महिलेनं देह व्यापाराचा धंदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीला संशय होता की, पत्नीचे परपुरुषासोबत संबंध आहेत. ज्यामुळे पतीनं घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. फूटेज पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यानं पाहिलं की, त्याची पत्नी काही परपुरुषांना घरी बोलवत होती आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवत होती. हे पाहून पतीला धक्काच बसला.

पती म्हणतो की, त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला पत्नीच्या देह व्यापाराच्या धंद्याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर पतीनं घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यानंतर पतीला सगळं सत्य समजलं होतं. परंतु पत्नीचं एकदम याउलटच म्हणणं होतं. तिनं पतीवर आरोप केले की, तो तिला मारहाण करतो आण तिला खर्चासाठी पैसेही देत नाही. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांचा तपास सुरु आहे. कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे हे तपासाअंती समोर येईलच. परंतु सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like