जिमच्या बहाण्याने पत्नी खेळत होती ‘जुगार’, पतीला समजलं मग झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या राजकोट येथील एका महिलेला जुगाराची सवय लागल्याने तिला चक्क बारा लाख रुपये हरावे लागले आहेत. यासाठी तिने घरातील दागिने गहाण ठेवले. तिच्या सासरकडच्यांना याबाबत तेव्हा माहिती मिळाली जेव्हा एक महिला अकरा लाखांच्या वसुलीसाठी घरी पोहचली. यानंतर महिलेचा पती अंकित भिमानी यांनी आपली पत्नी एकताच्या विरोधात राजकोटच्या भक्तीनगर येथे तक्रार दाखल केली. पतीने आरोप केला आहे की पत्नी जिमचा बहाणा देत घरातून 10:30 वाजता निघायची आणि दुपारी दीड वाजता घरी यायची. यादरम्यान ती एका क्लबमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती पतीने दिली.

जुगाराच्या नादामुळे दागिने गपचूप ठेवले गहाण
अंकित यांनी सांगितले की, नवरात्रीच्या आठव्या दिवशी एकता न सांगता तिच्या माहेरी गेली. नवमीच्या दिवशी मी घरी असताना एक महिला आली आणि तिने सांगितले. जुगारात एकताने 11 लाख रुपये गमावले आहेत यामुळे ती पैसे वसुलीसाठी आली आहे, आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे पतीने त्या महिलेला सांगितले. आम्हाला न सांगता एकता तिच्या माहेरी गेली आहे तुम्ही तिकडे जाऊन वसुली करा असे सांगितले असता ती महिला तेथून निघून गेली.

तिजोरी तपासल्यानंतर जुगाराबाबतची मिळाली माहिती 
सुनेच्या जुगाराबाबतची माहिती मिळताच सासूने घरातील तिजोरी तपासली असता सोन्याचा हार, अंगठीसह 5.60 लाख रुपयांचे 11 दागिने गायब असल्याचे समजले. याबाबत एकताला विचारले असता तिने जुगाराची कबुली दिली.

एकताला सोबत ठेऊ इच्छित नाही पती
एकताचे पती अंकित सांगतात की, आम्हाला तिच्यावर अजिबात शंका नव्हती. तिने माझा विश्वासघात केला आहे. कुटुंबातील सदस्यांची फसवणूक केली आहे. म्हणूनच मी तिला माझ्याबरोबर ठेवू इच्छित नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/