मोबाईलला नेटवर्क नसले तरी तुम्ही करु शकता नंबरवरून कॉल, जाणून घ्या Jio ची नवीन फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूरसंचार क्षेत्रातील अग्रणी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना वाय-फाय कॉलिंग सेवा देणार आहे. याद्वारे, टेलिकॉम नेटवर्कशिवायदेखील Wi-Fi च्या मदतीने तुम्ही व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करु शकता. तसेच, ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. होय, युजर्सला या सेवेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. आपल्याकडे प्रीमियम स्मार्टफोन असल्यास काही सेटिंग्ज बदलून आपण Wi-Fi च्या मदतीने कॉल करू शकता. इतर कंपन्या देखील लवकरच याची सुरूवात करणार आह.

वाय-फाय कॉलिंग सेवा काय आहे – फोनमध्ये मोबाइल नेटवर्क येत नसते तेव्हा ही सेवा वापरात येते. त्यानंतर आपण Wi-Fi नेटवर्कद्वारे कॉल रिसिव्ह करू शकता. जर वायफाय नेटवर्क मजबूत असेल तर कॉल ड्रॉपची शक्यता फारच कमी आहे.

ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे 

ही सेवा आपल्या ग्राहकांना जिओमधून पूर्णपणे विनामूल्य प्रदान केली जात आहे. ग्राहक वाय-फाय नेटवर्कवर लाइव्ह वाय-फाय कॉलिंग करण्यास सक्षम असतील. व्हॉईस / व्हिडिओ-कॉलिंग अनुभवासाठी VoLTE आणि Wi-Fi सेवा दरम्यान स्विच करण्याची सुविधा आहे.

फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग सेवा कसे कार्य करेल ? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला ही सेवा मिळेल की नाही हे ? ते कसे माहित करावे ? हे वैशिष्ट्य सध्या केवळ निवडक डिव्हाइसमध्ये सपोर्ट करते. त्यासाठी आपल्याला आपल्या टेलिकॉम सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर जावे लागेल आणि आपला फोन लिस्टमध्ये आहे की नाही याचा शोध घ्यावा लागेल. जर आपला फोन या फिचरला सपोर्ट करत असेल तर अशाप्रकारे शोधा. आपण फोनच्या सेटिंग्जमध्ये हे वैशिष्ट्य तपासू शकता. Android डिव्हाइससाठी – सेटिंग्ज वर जा> कनेक्शन सेटिंग्ज> वाय-फाय कॉलिंग आढळेल.

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या युजर्सला सेटिंग्जवर जावे लागेल. येथे त्यांना कनेक्शनचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये त्यांना वाय-फाय कॉलिंगचा पर्याय चालू करावा लागेल, ज्यामुळे ही सेवा सक्षम होईल.

कोण करु शकतो याचा वापर- जिओकडून हे वैशिष्ट्य दीडशेहून अधिक स्मार्टफोनमध्ये दिले जात आहे. Apple iPhone 6s आणि नंतरच्या आयफोन मॉडेल्स व्यतिरिक्त, वाय-फाय कॉलिंग फ्लॅगशिप सॅमसंग डिव्हाइसवर Samsung Galaxy Note 10, Galaxy S10 मध्ये देखील करता येऊ शकते. या व्यतिरिक्त हे फीचर Samsung Galaxy M20, Galaxy A70, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 सारख्या स्मार्टफोनमध्येही काम करेल.