Jio ची स्पेशल सर्व्हिस : मोबाइलमध्ये कोणतेही ‘नेटवर्क’ नसले तरीही करा आपल्या नंबरवरून ‘कॉल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओ वायफाय कॉलिंग (Jio WiFi Calling Service) ची खास सुविधा देत आहे, ज्यामुळे आपण नेटवर्क नसल्यावरही कॉल करू शकता. त्यासाठी जिओ फोन नंबरवरून आपण कॉल करू शकाल आणि रिसिव्ह देखील करू शकाल. हे ग्रामीण भागात आणि कमी नेटवर्क असणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मदत करेल. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. जिओ वायफाय कॉलिंग सुविधेसाठी वापरकर्त्याला केवळ सध्याचा व्हॉइस प्लॅन आणि एचडी व्हॉइस कंपेटिबल डिव्हाइसची आवश्यकता असेल.

काय आहे वायफाय कॉलिंग सुविधा
ही सेवा त्यावेळी कामी येते जेव्हा फोन मध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसते. तेव्हा आपण वायफाय नेटवर्कद्वारे कॉल करू शकता आणि कॉल करण्यास देखील सक्षम असाल. जर वायफाय नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर कॉल ड्रॉपचे चान्सेस देखील फार कमी असतात.

मोफत दिली जात आहे ही सुविधा
जीओमार्फत आपल्या ग्राहकांना ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जात आहे. ग्राहक वाय-फाय नेटवर्कवर जीओ वाय-फाय कॉलिंग करू शकतील. यामध्ये voice/video-calling एक्सपेरिअन्स साठी VoLTE आणि वाय-फाय सुविधेच्या दरम्यान स्विच करण्याचा देखील पर्याय आहे. ग्राहक व्हिडीओ कॉल देखील करू शकतील. विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे निशुल्क आहे.

कशा पद्धतीने आपल्या फोनमध्ये वाय-फाय सुविधा काम करेल
अनेकांना प्रश्न पडतो की कशा पद्धतीने ही सुविधा आपल्या फोनमध्ये काम करेल. तर याबाबत अधिक माहिती म्हणजे ही सुविधा सध्या काही निवडक डिव्हाइसला सपोर्ट करत आहे. आपल्याला टेलीकॉम सर्विस प्रोव्हायडरच्या वेबसाईटवर जाऊन चौकशी करावी लागेल की आपला फोन या लिस्टमध्ये आहे की नाही. आपल्या फोनला हे फीचर्स सपोर्ट करत आहे की नाही ते या पद्धतीने पहावे. आपण आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये या फीचरला चेक करू शकता. अँड्रॉइड डिव्हाइससाठी Settings मध्ये जा> Connection Settings मध्ये जा> Wi-Fi calling मिळेल.

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे त्यांना Connections चा पर्याय मिळेल, ज्यामध्ये जाऊन त्यांना Wi-Fi Calling च्या पर्यायाला ऑन करावे लागेल, ज्याने ही सुविधा सुरु होईल.

अँड्रॉइड स्मार्टफोनवर वाय-फाय कॉलिंगचा कसा घेऊ शकाल लाभ ?
आपल्या डिव्हाइसवर वायफाय कॉलिंग सुविधा वापरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सक्रिय वायफाय नेटवर्कशी कनेक्ट करणे आवश्यक आहे. जिओने कोणत्याही एका नेटवर्कपुरती ही सुविधा मर्यादित केलेली नाही, याचा अर्थ असा की आपण कोणतेही उपलब्ध वायफाय नेटवर्क वापरू शकता. आपण आपल्या लोकेशनच्या कोणत्याही वायफायचा वापर करुन थेट वायफाय कॉलिंगचा लाभ घेऊ शकता.

आपले डिव्हाइस वायफाय नेटवर्कशी कनेक्ट केल्यानंतर, आपल्याला वायफाय कॉलिंग किंवा वायफाय कॉलचा पर्याय सेटिंग्स मेनूमध्ये जाऊन शोधावे लागेल. आपल्याला येथे वायफाय कॉलिंगचा पर्याय सक्षम करावा लागेल जेणेकरून आपला फोन नवीन सुविधेस सपोर्ट करू शकेल. आता आपला अँड्रॉइड स्मार्टफोन व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल दरम्यान VoLTE आणि WiFi नेटवर्क दरम्यान स्विच करण्यास सक्षम असेल.