फक्त 1 रूपयात 1 GB डाटा, ‘ही’ कंपनी देतेय Jio पेक्षाही मोठी ‘ऑफर’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – जिओने इतक्या स्वस्त दरात इंटरनेट सेवा सुरु केली होती त्यामुळे इतर कंपन्यांना देखील आपले दर कमी करावे लागले होते मात्र आता जिओ पेक्षाही स्वस्त दरात डेटा देणारी कंपनी समोर आली आहे जिने केवळ एका रुपयांमध्ये एक जीबी इंटरनेट डेटा द्यायला सुरुवात केली आहे. बँगलोर च्या या कंपनीचे नाव Wifi Dabba असे असून 2017 पासून ही कंपनी सेवा देत आहे.

या आधी 20 रुपयांमध्ये मिळत होता 1 जीबी डेटा
मिळालेल्या माहितीनुसार Wifi Dabba कंपनीकडून आता एका रुपयात एक जीबी डेटा मिळत आहे. मात्र सुरुवातीला कंपनी वीस रुपयांमध्ये एक जीबी डेटा देत होती. कंपनीकडे तीन प्लॅन आहेत. पहिल्या प्लॅनमध्ये एका रुपयात 1 जीबी डेटा, दुसऱ्या 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 जीबी डेटा दिला जाणार आहे. सर्व प्लॅनचा कालावधी हा एका दिवसासाठीचा असेल.

कशी देत आहेत एवढी स्वस्त इंटरनेट सेवा
Wifi Dabba ने चहाच्या आणि इतर लोकल दुकानांवर आपला वाय फाय राऊटर इंस्टॉल केला आहे. कंपनींच्या या कन्सेप्टचे नाव सुपरनॉड्स असे आहे. यामध्ये 20 किलोमीटर पर्यंत 100 जीबी प्रती सेकेंदच्या दराने इंटरनेटची सुविधा देता येते. यासंबधीची ऑपरेटिंग सिस्टीम देखील कंपनीने तयार केली आहे.

कंपनीने आता सेवा सोसायटीमध्ये देण्याच्या हिशोबाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. कंपनीने वायफायसाठी कोणत्याही प्रकारच्या केबल टाकलेल्या नाहीत तर सरकारकडून कसल्याही प्रकारचे स्पेक्ट्रम खरेदी केलेले नाही. यामध्ये कंपनीला केवळ राऊटरचा खर्च करावा लागत आहे म्हणून दर इतके स्वस्त देण्यात आले आहेत. कंपनीने स्वस्त इंटरनेटसाठी स्वतःची नेटवर्क सिस्टीम तयार केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –