Wifi Range Extender | आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Wifi Range Extender | स्मार्टफोन असो किंवा स्मार्टवॉच सर्वकाही खुप वेगाने विकसित होत आहे. सध्या प्रत्येकाला मजबूत कनेक्टिव्हिटी पाहिजे, अशावेळी वाय-फाय (Wifi) ची लिमिटेड रेंज एक मोठे आव्हान बनली आहे, परंतु आता लवकरच वाय-फाय वापरणार्‍यांचा अनुभव बदलणार आहे. एका रिपोर्टनुसार, वाय-फाय अलायन्सकडून एक नवीन वाय-फाय तंत्रज्ञान विकसित (Wifi Range Extender) केले जात आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेवूयात –

 

काय आहे नवीन तंत्रज्ञान –
या नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाय-फायचे नाव हॅलो वाय-फाय (Halow Wifi) आहे. एका रिपोर्टनुसार यामध्ये 1 किमीची रेंज मिळेल. यास नेक्स्ट-जेनरेशनचे वाय-फाय मानले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाय-फाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) पाहात तयार केले जात आहे.

कसे करेल काम –
सध्याच्या वाय-फाय तंत्रज्ञान बँडविद्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर काम करते. तर नवीन तंत्रज्ञानाचे वाय-फाय 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर काम करण्यासाठी विकसित केले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित हॅलो वाय-फाय वीजेचा खप कमी करेल. परंतु ते लो फ्रीक्वेन्सी (Low Frequency) वर डेटा सिग्नल (Data Signal) ट्रान्समिट करण्यात सक्षम आहे.

 

स्पीडवर होईल परिणाम –
डेटा स्पीड कमी राहण्याची शक्यता आहे, कारण हे लो स्पेक्ट्रमवर काम करेल, त्याच्या डेटा ट्रान्सफरचा स्पीड सामान्य वाय-फायपेक्षा कमीअसेल. मात्र, यामुळे ज्या डिव्हाईससाठी (IOT डिव्हाईस) बनवले जात आहे, अशा डिव्हाईसला वेगवान वाय-फाय स्पीडची आवश्यकता भासत नाही. (Wifi Range Extender)

 

Web Title :- Wifi Range Extender | wifi halow might be future long range iot applications Wifi Range Extender

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’ लसीकरणानंतरही आतापर्यंत 12000 ‘पॉझीटीव्ह’ तर 59 जणांचा मृत्यू

BMC Elections | BMC निवडणुकीपूर्वी ‘या’ माजी महापौरांचा राष्ट्रवादीत प्रवेश; मुंबईत NCP बळकट होणार

Sharad Pawar | ‘शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’; भाजप नेत्याचं विधान

Pune Crime | बहिणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने भावाकडून बायकोचा खून; मर्डरनंतर स्वतः केलं ‘हे’ कृत्य, प्रचंड खळबळ

Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | ‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले