अजब ! गीर च्या जंगलात आहेत ‘समलैंगिक’ सिंह, वैज्ञानिकही ‘चकित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही दोन मानवांमधील समलैंगिक संबंधांबद्दल ऐकले किंवा पाहिले असेलच. अलीकडेच भारतात कलम ३७७ चा यासंदर्भात झालेला निर्णयही मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता. पण आपल्याला माहित नसेल की आजकाल प्राण्यांमधील समलैंगिक संबंधही वाढत आहेत आहेत. होय, गुजरातमधील जुनागडमधील सिंहांमधील समलैंगिकतेच्या बातमीने लोकांना चकित केले आहे. जुनागडमधील गीर भागात सुमारे ६०० सिंह असून, त्यामधील अनेक सिंह समलिंगी संबंध बनवत आहेत.

ही सामान्य बाब – तज्ज्ञ :
जुनागडच्या गीर जंगलात सध्या सुमारे ६०० सिंह आहेत, त्यापैकी ३४० मादी आणि १०० नर सिंह आहेत. तसेच, येथे २४० सिंहांचे छावे आहेत ज्यांचे वय २ ते ८ वर्षे दरम्यान आहे. परंतु, सिंहांवर संशोधन करणारे वन्यजीव तज्ञ निशांत म्हणाले की, सिंहांनी समलैंगिक असणे सामान्य गोष्ट आहे आणि यापूर्वीही असे घडले आहे. जुनागडचे वन अधिकारी डॉ. डी.वासवडा यांनीही हे मान्य केले आहे आणि असे म्हटले आहे की नर सिंहांदरम्यान असे आढळून येते आणि ते आपापसांत समलैंगिक संबंध बनवणे सामान्य बाब आहे.

तथापि, वन्यप्रेमी मात्र सिंहाच्या समलैंगिकतेबद्दल चिंतेत आहेत आणि याकडे ते सिंहांसाठी धोक्याची घंटा म्हणून पाहत आहेत. सिंहांच्या जीवनशैलीचा अभ्यास आणि संशोधन करणारे डॉ. जलापन रूपापरा यांचे मत आहे की सिंहांमध्ये समलैंगिकतेची दृश्ये पाहायला मिळतात, परंतु यावरून त्यांच्यामधील शारीरिक संबंधांची पुष्टी करणे शक्य नाही.

याचे कारण सांगत ते म्हणाले की जर एक नर सिंह दुसऱ्या नर सिंहावर बसला असेल तर असे दिसते की त्यांच्यात शारीरिक संबंध चालू आहेत, परंतु हे सिंह २ वर्षांपासून ८ वर्षांपर्यंतचे आहेत जे अशा कामासाठी पुरेसे परिपक्व नाहीत आणि कुतूहलासाठी असे करतात. याचा अर्थ असा नाही की ते लैंगिक संबंधच बनवत असतात.

Visit : policenama.com