खुशखबर ! ‘कोरोना’ महामारी दरम्यानच आगामी 60 दिवसात 1 लाख लोकांना नोकरी देणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटकाळात भारतीय कापड उद्योग, बॅग बनवणार्‍यांसह अनेक कंपन्यांनी आपल्या बिजनेस मॉडलमध्ये तात्कालिक बदल केले आहेत, ज्याचा फायदा कंपनीसह देशाला होणार आहे. सध्या मास्क आणि पीपीई किटला सर्वात जास्त डिमांड आहे. अशावेळी ट्रॅव्हल बॅग, प्रवास आणि फॅशनशी संबंधीत वस्तू बनविणारी कंपनी वाइल्डक्राफ्ट पुढील 60 दिवसात सुमारे एक लाख लोकांना कामावर ठेवणार आहे. कोरोना व्हायरसचे संकट पाहता कंपनी वैयाक्तिक सुरक्षेशी संबंधित सामानाची (पीपीजी) निर्मिती आणि वितरणाचा वेग वाढवणार आहे.

बेंगळुरूच्या या कंपनीने 11 शहरात 63 कारखान्यांसोबत टायअप केले आहे. यामुळे कंपनी आतापर्यंत सुमारे 30,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. या कारखान्यांमध्ये कंपनी दुसर्‍यांदा उपयोगात येणारे वैयक्तिक सुरक्षा किट (पीपीई) आणि तोंडावर लावले जाणारे मास्क ’सुपरमास्क’ ची निर्मिती करत आहे.

10 लाख मास्क रोज तयार करण्याची क्षमता
कंपनीची 10 लाख मास्क रोज बनवण्याची क्षमता आहे. कंपनीचे सह-संस्थापक गौरव डुबलिश यांनी म्हटले की, कोविड-19 मुळे या उत्पादनांची मागणी वाढली आहे. परंतु, कपड उद्योगाने कधीही आरोग्य देखभालीची उत्पादने फॅशन उत्पादन श्रेणीत उत्पादित होताना पाहिले नव्हते. आम्ही हे नवीन स्वरूप खुबीने घेतले आहे.

पीपीजी कॅटेगरीवर जोर
पीपीजी कॅटेगरीवर जोर देत डुबलिश यांनी म्हटले की, आम्ही कमीतकमी या क्षेत्रासाठी तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या उपक्रमावर आमचा विश्वास आहे. या संधीचा लाभ घेत आम्ही येणार्‍या दिवसात एक लाखपेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्यास सक्षम होऊ. वाइल्डक्राफ्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.