करिश्मा कपूरची मुलगी ‘समायरा’ करणार बॉलिवूड डेब्यू ? अभिनेत्रीनं केला ‘खुलासा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री करिश्मा कपूर हिनं आपल्या मुलीच्या डेब्यूवर भाष्य करत त्यावरील मौन सोडलं आहे. सध्या तिची मुलगी शिक्षण घेत आहे. सिनेमा बनवण्याच्या विविध अंगांबद्दल ती माहिती आहे असं करिश्मानं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत तिला समायराच्या डेब्यूबद्दल विचारल्यानंतर करिश्मा कपूर म्हणाली, “अरे देवा. हे खरं नाहीये. माझी मुलगी आणि तिचे मित्र सिनेमाच्या सर्व अंगांबद्दल माहिती घेत आहेत. सिनेमात तिला रूची आहे. परंतु पडद्यामागे की, कॅमेऱ्यासमोर हे मलाही माहिती नाही. ते प्रयोग करत आहेत आणि शिकत आहेत. त्यामुळं सध्या तरी असा काही प्लॅन नाही. याहून अधिक म्हणजे समायरा खूप लहान आहे. सध्या ती शाळा शिकत आहे. हे सगळे प्रोजेक्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीविटीज आहेत.”

समायरानं अभिनेत्री व्हावं अशी तुमची इच्छा आहे का, हे विचारल्यानंतर करिश्मा म्हणाली, “इमानदारीनं सांगायचं झालं तर हे तिच्यावर आहे. ती तिला कधीच मोटीवेट किंवा डिमोटीवेट नाही करणार. परंतु मी त्यांच्या निर्णयांचं नक्कीच समर्थन करते. मला असं वाटतं की, आपण स्वत:वर विश्वास ठेवावा आणि आपल्याला ज्यातून खुशी मिळते ते करावं.