4 महिन्यात अयोध्येत ‘गगन’चुंबी राम मंदिर उभारू, HM अमित शहांचं वक्तव्य

रांची : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष अमित शहा हे झारखंड विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर असून पाकुडमध्ये आयोजित जनसभेत त्यांनी राम मंदिरावर मोठे विधान केले आहे. येत्या चार महिन्यात आयोध्येत गगनचुंबी मंदिर उभारु, अशी घोषणा अमित शहा यांनी केली. तसेच चार महिन्यात आयोध्येत राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचं म्हटलं.

काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल
काँग्रेसवर जोरदार टीका करताना अमित शहांनी आयोध्येत राम मंदिराचा उभारणी केव्हा होणार, यावर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. आता पुढील चार महिन्यामध्ये आयोध्येत प्रभू रामांचे गगनचुंबी मंदिर ऊभारू, अशी घोषणा केली. झारखंडमधील सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला. काँग्रेस ना विकास करू शकते, ना देशाला सुरक्षित ठेवू शकते. त्यांना जनभावनादेखील समजत नाही, अशा शब्दात अमित शहांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस दहशतवादाला कठोर पद्धतीने सामोरे जात असताना काँग्रेसला मात्र तुष्टीकरण आणि मतपेटीचे राजकारण करताना दिसतेय. आता नागरिकत्व कायद्याला काँग्रेस मुस्लिमविरोधी ठरवत आहे. प्रत्यक्षात हा कायदा मुस्लिमविरोधी नाहीच, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. कायद्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशातील अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिक्तव देण्याची तरतूद आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/