चंद्रकांत पाटील लाखांची हॅट्रट्रिक साधणार का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री आणि बाहेरचा उमेदवार म्हणून चर्चा झालेल्या कोथरुड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतील असून ते लाख मतांची हॅट्रट्रिक साधणार का हीच मतदारसंघात चर्चा आहे.

भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी २०१४ मध्ये एक लाखाहून अधिक मते घेतली होती. तर, लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरुडमधून १ लाख ६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील हे ही आघाडी टिकविणार का असे विचारले जात आहे.

आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोथरुडमधून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या १ लाख ६ हजार मतांच्या आघाडीत किमान १ हजार मतांनी भर घालून किमान १ लाख ७ हजार मतांची आघाडी मिळेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. राज्यात महायुतीला २५० जागा मिळेल, अशी अपेक्षा आहे. आपण दिवसभर भाजपाच्या कार्यालयात थांबून निकालावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com