लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी घोषणा

चेन्नई : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रजनीकांत यांनी आपण तमिळनाडूची आगामी विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार याबद्दल सगळ्यांचाच उत्सुकता आहे . मात्र लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते. त्यानंतर आता रजनीकांत यांनी आपण तमिळनाडूची आगामी विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

तमिळनाडूमध्ये १८ विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका सुरू आहे. त्याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रजनीकांत म्हणाले की , ‘या निवडणुकीत जर अण्णा द्रमुकला बहुमतासाठी जर जागा कमी पडल्या आणि जर निवडणुकांच्या घोषणा झाल्या तर आम्ही निवडणूक लढवू. ‘तसेच मोदी पुन्हा निवडून येणार का प्रश्नावर माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर त्यांनी २३ मे ची वाट पाहा असे उत्तर दिले.

अभिनेते रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतला. ‘रजनी मक्कल मन्दरम’ असे रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव आहे.