निर्भया केस : ‘आग’ लावा कायद्यांच्या पुस्तकांना, आईचा ‘आक्रोश’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या (1 फेब्रुवारी) फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना शिक्षा देण्यात येणार होती. मात्र, दिल्ली न्यायालयाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे. आरोपींची पुन्हा एकदा फाशी टळल्याने निर्भयाची आई संतापली असून प्रचंड हताशही झाली आहे.

सात वर्षापूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. मात्र जे काही सध्या सुरु आहे, त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना असा आक्रोश निर्भयाच्या आईने व्यक्त केला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भयाच्या दोषींच्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.

यामुळे निर्भयाची आई आशा देवी यावर प्रचंड संतापल्या आहेत. कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशी रडत संवाद साधला. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबवणीवर पडेल, असे दोषींच्या वकिलांनी मला आधीच सांगितले होते. दोषींचे वकील ए.पी. सिंहने मला आव्हान दिलं होतं. दोषींची फाशी अनंत काळासाठी लांबणीवर टाकून दाखवतो, असे ते म्हणाले होते. सात वर्षापूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. आता सरकार मला आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझी लढाई मी सुरुच ठेवीन असे त्यांनी सांगितले. कायद्याच्या त्रुटीमुळे दोषीच्या वकिलाने जे आव्हान दिलं. दोषींना जे हवं होत तेच झाला. फाशी लांबणीवर गेली.

दोषींना फाशी द्यावीच लागेल असे म्हणत त्यांनी मी लढणार असल्याचे सांगितले. कोर्टाला फाशी द्यावीच लागेल. नाही तर केवळ दिशाभूल करण्यासाठी फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वांना शांत करण्यासाठीच ही शिक्षा सुनावण्यात आली होती असे सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत सर्वांना कबुली द्यावी लागेल असेही निर्भयाच्या आईने म्हटले आहे. जर असेच व्हायचे असेल तर नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना आगी लावल्या पाहिजेत असा आक्रोशही त्यांनी केला.