देशाविरोधी कारवाई करणाऱ्यांना ठेचून काढू : फडणवीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 

राज्यघटना व देशहिताच्या विरोधात कृती करणाऱ्या व्यक्तीविरोधात आम्ही कारवाई करत आहोत. यात राजकीय षडयंत्र असल्याचा प्रश्नच येत नाही. मला डावी व उजवी विचारसरणी यातले काही कळत नाही. मात्र, राज्यघटनेविरोधात वागणाऱ्यांना मी ठेचून काढेन. तोच माझा राजधर्म आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समितमध्ये ते बोलत होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08c69529-ca01-11e8-be8b-13f85c522e52′]

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशविरोधी कारवाई करणारा व्यक्ती कोणत्याही जाती, धर्माचा, संस्थेचा असला तरी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पाच मानवाधिकार कार्यकत्र्यांची पुणे पोलिसांनी केलेली अटक हे राजकीय षडयंत्र नाही. तसे असते तर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला बेकायदेशीर ठरवले असते. न्यायालयाच्या निर्णयाने ढोंगी उदारमतवाद्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे.

[amazon_link asins=’B06XH15XJJ,B00IYFJ590,B00ZCFZ03A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21dd9ddb-ca01-11e8-9d46-07719c2104a9′]

कोरेगाव भीमा येथील प्रकार हा दोन समाजात वाद निर्माण करुन नागरी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा नक्षलसमर्थकांचा डाव होता. या घटनेमुळे त्यांचा हा प्रयत्न उघडा पडला असून पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. या नक्षलसमर्थकांचा माओवादी लोकांशी संपर्क असून विविध मार्गाने ते गडचिरोली, झारखंड, छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांना पाठबळ पुरवत असतात. अशा ढोंगी उदारमतवाद्यांना व देशविघातक कृत्य करणाऱयांना लवकरच वठणीवर आणू, असे फडणवीस म्हणाले.

भाजप सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही : खा. सुप्रिया सुळे