मृत्यू पत्करेन पण…, राहुल गांधींचं मोदींना ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या सभांदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. काहींनी वादग्रस्त विधाने केली. या आरोप प्रत्यारोपामध्ये केंद्रस्थानी होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी सतत नेहरु-गांधी कुटुंबावर टीका केली.

या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण प्रत्यारोप करताना कधीही नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही असे आश्वासन दिले. आम्ही त्यांचा प्रेमाने पराभव करू पण कधीच आई-वडिलांचा अपमान करणार नसल्याचे राहुल गांधी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार द्वेषाने बोलतात. त्यांनी माझे वडील, आजी, आजोबांचा अपमान केला. पण मी आयुष्यात मोदींच्या कुटुंबाचा अपमान करणार नाही. एकवेळ मृत्यू पत्करेन पण त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही. मी आरएसएसचा किंवा भाजपाचा नाही. पण काँग्रेसचा आहे. नरेंद्र मोदींच्या द्वेषाला आम्ही प्रेमाने उत्तर देऊन, गळाभेट घेत त्यांचा पराभव करू असे राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक मुद्यावरून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एअर स्ट्राईकच्या वक्तव्यावरून देखील राहुल गांधीनी टीका केली. यावेळी त्यांनी पावसामुळे लढाऊ विमाने रडारवरून कशी गायब होतात असा सवाल विचारत मोदींची खिल्ली उडवली.

तुम्ही जनतेला आंबे कसे खायचे ते सांगता. कुर्ता कसा घालायचा हे शिवण्याचा प्रयत्न करता. मात्र बेरोजागारीचे काय असा प्रश्न उपस्थित करून वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होता त्याचे काय झाले याचे उत्तर द्या, असेही राहुल गांधीनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like