एकनाथ खडसेंच्या मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून ‘हे’ सूचक विधान

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भूखंडात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मंत्रिपदापासून वंचित होते मात्र या आरोपातून क्लीन चिट मिळाल्यानंतर खडसे यांनी मंत्रिपद स्वीकारले नव्हते. महाजानदेश यात्रा सध्या जळगावात पोहचली होती त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी खडसेंच्या मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला.

माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का ? केंद्रात पाठवायचे ? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र विधानसभा निवडणुकांवेळी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंना विधानसभेचं तिकीट देऊन खडसेंची नाराजी चांगलीच दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. दरम्यान, मी पक्षाकडे विधानसभेलाच उमेदवारीची मागणी करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी यापूर्वी म्हटलं आहे.

भूखंड घोटाळ्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर कुख्यात अतिरेकी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांच्या मंत्रिपदाच्या नावाची चर्चा नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like