औरंगाबादमधील 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा उद्या उघडकीस आणणार – MIM चे खासदार इम्तियाज जलील यांचा दावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद महापालिका, वक्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि शहरातील व्यापारी, बिल्डर, भूमाफिया यांनी मिळून शंभर कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यासंदर्भातील ट्विट इम्तियाज जलील यांनी केले असून हा घोटाळा उद्या ( शनिवारी ) उघडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी केलेल्या या आरोपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घोटाळ्यात महापालिका, वल्फ बोर्ड, रजिस्ट्री कार्यालयांमधील अधिकारी, बिल्डर आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जर पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता याची सखोल चौकशी केली, तर नक्कीच भूमाफिया जेलमध्ये जातील, असा मला विश्वास असल्याचे ट्विट खासदार जलील यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी देखील खासदार जलील यांनी औरंगाबाद महापालिकेतील भ्रष्टाचारावरून जाहीर आरोप केले होते. त्यांनी रस्त्याची कामे, कचऱ्याचे कंत्राट, बांधकाम विभागाशी संबंधित कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.