नीरेच्या गावठाणाचा प्रश्न सोडविण्याकरिता पाठपुरावा करणार – आ. संजय जगताप

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – ( ता. पुरंदर ) गावच्या विकासासाठी नागरिकांनी सुचना कराव्यात त्या पुर्ण केल्या जातील तसेच नीरा गांव नगरविकास विभागाच्या टीपीएस स्कीम मध्ये बसवून नीरेच्या गावठाणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

नीरा शिवतक्रार ( ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व नीरा विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आ. संजय जगताप, जि. प. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित विजयी सभेत आ. संजय जगताप बोलत होते.

यावेळी पुणे जि. प. चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोदकाका काकडे, रमणिकलाल कोठडिया, चंदरराव काकडे, नाना जोशी, धनंजय काकडे, पं. स. समिती सदस्या सुनिताकाकी कोलते, गौरव जाधव यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, नगरविकास विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून नीरा हे गांव टीपीएस मध्ये बसत असेल तर टी. पी. एस.ची स्किम संपुर्ण नीरा गावासाठी केल्यास नीरेतील गावठाणाचा व रस्त्याचा प्रश्न सुटेल. याकरिता पालकमंञी व महसुलमंञी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. नीरेतील सांडपाण्याच्या सीव्हीएस प्लँटसाठी सहकार्य करणार असून महिला अस्मिता भवन, स्पोर्ट कॉम्पलँक्स, पालखी तळावर वॉकिंग ट्रँक, बगिचा, तीर्थक्षेञ विकास आराखड्यातून महादेव मंदीरानजिक घाट बांधण्याकरिता प्रयत्न करणार आहे.

प्रमोदकाका काकडे म्हणाले की, राज्य शासनाकडून जलजीवन मिशनसाठी जास्तीत – जास्त निधी प्राप्त होत असून त्यामुळे नीरेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नीरेच्या विकासासाठी झुकते माप देऊन जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करणार आहे.

विराज काकडे म्हणाले, नीरेची फिस्टर योजना एक महिन्याच्या आत पुन्हा सुरू करून नीरेकरांना शुद्ध पाणी देणार असूूून खा.सुप्रिया सुळे यांनी नीरेच्या रस्त्याकरिता, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी भरीव मदत केली आहे.

राजेश काकडे म्हणाले की, नीरेतील नागरिकांना अपेक्षित असणारा विकास पाच वर्षाच्या कार्यकाळात करणार असून प्रथम आरोग्य, शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व देणार आहे. तसेच नीरा गांव सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य विराज काकडे , नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रा. पं. सदस्य संदीप धायगुडे, वैशाली काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिपक काकडे यांनी केले. सुञसंचालन नेहा शहा यांनी केले तर आभार राधा माने यांनी मानले.