भटक्या समाजाला नागरिकत्व मिळेल का ? शरद पवारांचा मोदी सरकारला ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रसने CAA आणि NRC ला विरोध केला आहे. तसेच या दोन्ही कायद्यांविरोधातील आंदोलनातही राष्ट्रवादीने सहभाग घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आपल्या देशात भटका समजा आहे, त्यांना नगरिकत्व मिळेल का असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. अल्पसंख्यांक सेलच्या बैठकीत शरद पवार बोलत होते.

 

अल्पसंख्यांक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती. त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचे आहे. एनआरसी आणि सीएए यामुळे मुस्लिम समाजाला दुर्लक्षित केले जात आहे. तर दुसरीकडे भटक्या विमुक्त जाती-जमातीचे लोक आहेत ते कामानिमित्त एका जागेवर राहत नाहीत. अशा लोकांच्या नोंदी मिळत नाहीत. त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच असे न झाल्यास त्या नागरिकावर अन्याय होणार आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले, क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होते. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नाकारली जाते, असे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –