विधानसभेमध्ये राहून मराठा आरक्षण मिळवून देणार : आमदार नितेश राणे

मुंबईः पाेलीसनामा ऑनलाईन

विधानसभेत राहूनच मराठा आरक्षण मिळवून देणार अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी रात्री उशिरा जाहीर केली. आमदार राणे यांनी निवेदनात म्हटले आहे की आमदारकी मला समाज आणि महाराष्ट्रापेक्षा मोठी नाही.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a49a09eb-9028-11e8-b191-550ad371ef2b’]
पण जिथे कायदे बनतात त्या विधानसभेमध्ये राहून मी मराठा आरक्षण मिळवून देणार. मी मैदान सोडून पळणार नाही. उद्या मराठा आरक्षणावर विधानसभेत मतदान झाले आणि आपली संख्या कमी असली तर मग काय ? सरकारवर दबाव कसा टाकायचा ? विचार करून पाऊले टाकू. युक्ति तिथे युक्ती, शक्ती तिथे शक्ती.