कोविड -19 लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत का ?, ‘सिरम:च्या आदर पूनावाला यांनी विचारलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू महामारीत लढा देण्याबाबत भारताला पुढील आव्हान देताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी शनिवारी विचारले की, केंद्र सरकारकडे कोविड – 19 लसींच्या खरेदी व वितरणावर पुढील एक वर्षात खर्च करण्यासाठी 80,000 कोटी रुपये आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ” प्रश्न:पुढील वर्षात भारत सरकारकडे 80,000 कोटी रुपये असतील? कारण भारतात प्रत्येकासाठी लस खरेदी आणि वितरणासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला इतक्याच रक्कमेची आवश्यकता आहे.” पूनावाला यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, “हे पुढील आव्हान आहे, ज्याला आपल्याला सामोरे जायचे आहे. ”

दरम्यान, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित डोसच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे, जे नवीन कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या लसींवर काम करत आहे. त्याच्या विविध संभाव्य लसींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी असलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसीचा समावेश आहे. त्याचबरोबर, ती स्वतःची लसही विकसित करीत आहे.

कोण आहे आदर पूनावाला
आदर पूनावाला सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. त्यांचे वडील डॉ. सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये सीरम संस्थेची स्थापना केली. ही कंपनी पूनावाला ग्रुपचा भाग आहे. आदर पूनावाला यांनी युनायटेड किंगडमच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. 2001 मध्ये आदर पूनावाला वडिलांच्या कंपनीत रुजू झाले. असे मानले जाते की त्यांनी सीरम संस्थेच्या वाढीस आणि त्यातील आंतरराष्ट्रीय वाढीसाठी खूप हातभार लावला. 2011 मध्ये ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.