पंतप्रधान नरेंद्र मोदींना २३ मे ला फासावर लटकावण्याची भाषा ; काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य

जशपुर नगर (छत्तीसगड) : वृत्तसंस्था – निवडणूक आयोग वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई तर करत आहे मात्र नेते वादग्रस्त वक्तव्य करण्याचे थांबवत नसल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगढमधील काँग्रेसच्या उमेदवाराने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना २३ मे ला फासावर लटकवणार असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. दोन टप्प्यातही मतदान पूर्ण झाले आहे. आता येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, छत्तीसगडमधील रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठिया यांनी आयोजित प्रचार सभेत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. मतदानाचे आवाहन करतानाच येत्या २३ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फासावर लटकवणार आहे. असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह तुम्ही छोटेच माणूस आहेत. त्यामुळे तुम्ही लायकीत राहा. असेही त्यानी म्हंटले. शंभर दिवसांतच काँग्रेसचे लोक बरळायला लागलेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जी हालत आहे तीच राठियांचीही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.