राज्यातील ‘दोन-अडीशे’ घराण्यांनी महाराष्ट्र ‘लुटला’, त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दोन्ही काँग्रेसमधील अडीचशे घराण्यांनी महाराष्ट्र लुटला. त्यामुळे मागच्या पाच वर्षात आमचे सरकार हतबल होते. आता मजबूत सरकार आणायचे आहे. त्यासाठी नेटाने कामाला लागा, असे आवाहन महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (रविवार) कोल्हापूर येथे केले. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील दोन-अडीचशे घरण्यांनी महाराष्ट्र लुटला. राज्यातील साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत, त्यांची चौकशी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहिर केले. शरद पवार यांच्या घराणेशाहीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, नेहरू-गांधींनी देश चालवला तर शरद पवारांनी महाराष्ट्र चालवला. शरद पवार खासदार, मुलगी खासदार, पुतण्या माजी मंत्री आणि आता रोहीत पवार विधनसभा लढवणार आहेत. ही घराणेशाही नव्या पिढीला मान्य नसल्याने ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

कोणालाही भीती दाखवत नाही
घराणेशाहीमुळे भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाजपामध्ये यावे यासाठी कोणालाही भीती दाखवण्याची गरज नाही. भाजपामध्ये येणारा प्रत्येकजण स्वखुषीने येत आहे. भाजपामध्ये आणण्यासाठी कोणाला भीती घालण्याची गरज नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये इतर पक्षातील लोक येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तर न्यायलयात दाद मागावी
आयकरच्या धाडी किंवा ईडीचे छापे काय आठ दिवसांत टाकता येत नाहीत, त्यासाठी यंत्रणा सहा-सहा महिलने अभ्यास करते. त्यामुळे पवार किंवा हसन मुश्रीफ नुसता कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारवाईबद्दल हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागीवी, आम्ही काय कुणाला आडवले नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –