‘सत्यमेव जयते 2’ मध्ये अभिनेता जॉन अब्राहम साकारणार 3 भूमिका ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमनं त्याचा आगामी सिनेमा सत्यमेव जयते 2 या सिनेमात तीन भूमिका करण्याच्या अफवांवर काही ठोस असं स्पष्टीकरण दिलेलं नाही. नुकताच या अफवांनी जोर धरला होता. मिलाप जावेरी दिग्दर्शित या सिनेमात ॲक्शन स्टार जॉन तीन वेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. परंतु आता असं वाटत आहे की, या रिपोर्टची कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या अफवा आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जाताना दिसत आहे.

जॉननं सांगितल्यानुसार, सत्यमेव जयते 2 हा सिनेमा 2018 साली आलेल्या त्याच्या पहिल्या सिनेमाच्या तुलनेत एकदम वेगळा असणार आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की, “पहिला सिनेमा साधारणपणे सामान्य जनतेसाठी होता. परंतु यावेळी आम्ही एका प्रवर्गासोबतच प्रासंगिक मुद्द्यांनाही सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

एका रिपोर्टनुसार, तीन भूमिकांबद्दलच्या अफवांवर बोलताना जॉन म्हणाला, “मिलाप अजूनही काही भूमिकांवर काम करत आहे. इतर भूमिका साकारण्यासाठी तो माझी निवड करू शकतो. परंतु यावर अद्याप खूप चर्चा होणं बाकी आहे. त्यामुळे सिनेमात भूमिका एक असेल, दोन असतील की, तीन असतील असं मी फिक्स काही सांगू शकत नाही.”

https://www.instagram.com/p/B33qqVBFBK7/

जॉनच्या सत्यमेव जयते 2 या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.