मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ?

माले (मालदीव) : वृत्तसंस्था

गेल्या दोन वर्षांपासून हिंदी महासागरात भारताचा शेजारी असलेल्या मालदीवशी चीनमुळे भारताचे संबंध ताणले गेले होते. मालदीवमधील निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे. मालदीवमधील राष्ट्रपती निवडणुकीत मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीचे इब्राहिम मोहम्मद सोलिह जिंकले आहेत. सध्याचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना त्यांनी हरविले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b626b28d-c0ab-11e8-9766-ed7d22dfdafe’]

मालदीव मधील राष्ट्रपती निवडणुकीतील निकाल हा सर्वांनाच धक्कादायक होता. सत्ताधारी असलेल्या अब्दुल्ला यामीन यांचा पराभव होऊ शकत नाही, अशीच शक्यता वर्तवली जात होती;  परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांच्या पराभवानं एक प्रकारे चीनलाही धक्का बसला आहे.

‘Paytm’ होणार अधिक सुरक्षित; येणार ‘फेस लॉगइन’ फीचर 

यामीन हे चीनच्या फारच जवळ होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत फटकून वागत होते. परंतु आता सोलिह यांच्या विजयानं भारताच्या आशा वाढल्या आहेत. यामीन नोव्हेंबर २०१३ मध्ये राष्ट्रपती बनले होते.  यामीन यांचा कल हा चीनच्या बाजूने आहे. त्यांच्या कार्यकाळात चीनने सेवा-सुविधा क्षेत्रात मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d47ccf65-c0ab-11e8-a72b-9fae477bd877′]

विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणूक जिंकलेले इब्राहिम सोलिह हे भारत समर्थक म्हणून ओळखले जातात.  सोलिह हे राष्ट्रपती बनणार असल्याने भारत आणि मालदीव यांच्यामधील द्विपक्षीय संबंध सुधारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.