home page top 1

MS धोनी लवकरच राजकारणात दिसणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीच्या एका मित्राने शेयर केलेल्या फोटोमध्ये धोनी राजकारण्यांच्या रूपात दिसून येत असून यामुळे या शंकेला वाव मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी देखील धोनी राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

धोनी नुकताच भारतीय लष्कराची सेवा बजावून घरी आला आहे. त्याचदरम्यान त्याचा हा फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांना याबाबत शंका वाटत आहे. धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक मिहिर दिवाकरने हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याआधी देखील भाजपचे नेते संजय पासवान यांनी धोनी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी देखील पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र धोनीने त्यावेळी आपले पत्ते उघडले नव्हते.

धोनी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय लष्कराची सेवा बजावून नुकताच घरी परतला आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून याबाबत त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
दरम्यान, वर्ल्डकपनंतर धोनीने दोन महिन्यांची विश्रांती घेतली असून आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो खेळतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
You might also like