राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, ठोकून काढू : राजू शेट्टी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना दुधाचा भाव वाढवून दिला होता. यावेळी सरकारने दूध संघांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन दूध संघांनी दुधाला वाढीव भाव दिला. मात्र, सरकारने कबूल केलेले अनुदान अजूनही दूध संघाना दिलेले नाही. १ ऑक्टोबरपासून सर्व दूध संघ दुधाचा भाव कमी करण्याचा विचार करत आहेत. जर दुधाचा भाव कमी झाला, तर तेथून पुढे राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू न देता स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4d21612-c3a1-11e8-94f7-27f3a3601edd’]
अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आयोजित जिल्हा उस आणि दूध परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा समाजार घेताना शेट्टी यांनी थेट मंत्र्यांना इशाराच दिला आहे. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोपळे आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa1a5254-c3a1-11e8-8f5e-710e0d87245a’]
खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रात इतर कारखाने ऊस उत्पादकांना शेतकरी संघटनेने जाहीर केलेला भाव देतात. मात्र, नगर जिल्ह्यातील साखर सम्राट शासनाने व संघटनेने ठरवून दिलेला भाव ऊसाला देत नाही. त्यामुळे ही ऊस परिषद अकोल्यात घेतली आहे. देशातील २०३ संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारे दोन विधेयक तयार करण्यात आले असून, विशेष अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी २८, २९ व ३० नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5de9509e-c3a2-11e8-9e71-2faf6059e001′]
शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लीनचीट दिलेली नाही : सुप्रिया सुळे

मुंबई : राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठेही क्लीनचीट दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पवारांच्या वक्तव्यानंतर राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीतही खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26ffda09-c3a2-11e8-8008-5f956edcd45b’]
याबाबत स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे कोणी पवारांनी क्लीनचीट दिली असे सांगत आहेत, त्यांनी ती मुलाखत नीट पाहिलेली नाही किंवा ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. शरद पवारांनी तीन गोष्टी सांगितल्या त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विमानांच्या किंमती का वाढल्या? ते सरकारने स्पष्ट करावे. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे. भाजपाने बोफोर्सच्यावेळी जेपीसीची मागणी केली आणि आता राफेलच्यावेळी ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत, असे पवार म्हणाले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पवार यांनी भाजपाच्या या दुटप्पीपणावर टीका केली होती,  असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3328094e-c3a2-11e8-8cfd-c1b061f661e1′]
शरद पवार यांनी राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याने वाईट वाटले. ते २० वर्षांपासून पक्षासोबत होते. त्यांनी शरद पवारांना एकदा फोन करुन चर्चा करायला हवी होती.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सरचिटणीस  आहेत. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.